महाराष्ट्र

मोफत कृत्रिम अवयव वाटपाचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा – अमरसिंह पंडित* ============= *रविवार, दि.१३ सप्टेंबर रोजी शारदा प्रतिष्ठानकडून शिबीराचे आयोजन*

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र....

गेवराई/विष्णु राठोड,

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.अजिदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहामध्ये शारदा प्रतिष्ठान, शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सहभाग नोंदविलेल्या दिव्यांगांच्या हात व पायांची तपासणी करण्यात आली होती. तज्ञांच्या सल्ल्यानुसार पात्र दिव्यांगांना रविवार, दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय यांचे वाटप होणार आहे. गरजू दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराईत भव्य जनसेवा सप्ताहाचे आयोजन केले होते. शारदा प्रतिष्ठान गेवराई, शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्युट आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तज्ञ डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये ज्या दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय बसविणे शक्य आहे त्यांची मोजमापे त्यावेळी घेण्यात आली होती. यापूर्वी तपासणी केलेल्या पात्र दिव्यांग बंधु-भगिनींना रविवार, दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी गरजू दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

शारदा प्रतिष्ठानकडून सातत्याने समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले जाते. गरजू दिव्यांग बंधु-भगिनींना गेवराई सारख्या ग्रामीण भागात अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फायबरपासून तयार केलेले वजानाने हलके व मजबुत लाखो रुपये किंमतीचे कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करून देण्याचे काम या शिबीराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबीराचे आयोजन होत असून दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभा करण्याचे काम या माध्यमातून शिवछत्र परिवार करत आहे. या कार्यक्रमाला आ. विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पात्र दिव्यांग बंधु-भगिनींनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button