महाराष्ट्र

अमरजीत राम बाहेती यांना संगीत विषयातील पीएच.डी. प्रदान.. 

भारतीय संघर्ष Live...

 

गेवराई ! विष्णु राठोड..

दि. १६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून अमरजीत राम बाहेती यांना “मराठवाड्यातील स्वातंत्र्योत्तर लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीतातील स्त्रियांचे स्थान व योगदान: चिकित्सक अभ्यास” या विषयातील संशोधनासाठी संगीत विषयातील पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. वैशाली संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. या यशाबद्दल अमरजीत यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. सुनंदा गोरे, सुजाता कानगो, रेखा आवरगांवकर, डॉ. भारती गवळी, डॉ. रजनी शिखरे, डॉ. निलिमा पांडे, डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. कैलास अंभुरे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. अमरजीत बाहेती या संगीतामध्ये विशारद असून डॉ. वैशाली देशमुख, प्रा. पं. विजय देशमुख, प्रा. आनंद पाटील, पं. राम विधाते व बजरंग विधाते, आशालता भंडारे हे त्यांचे संगीतातील गुरू आहेत. अमरजीत बाहेती यांची ओळख शाहीर अशीही असून, डॉ. प्रभाकर मांडे यांच्याकडून त्यांना लोकसाहित्याचे, तर शाहीर अंबादास तावरे यांच्याकडून लोकसंगीताचे मार्गदर्शन लाभले आहे. डॉ. अमरजीत बाहेती या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. समाधान इंगळे यांच्या पत्नी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button