मुंबई / (प्रतिनिधी) भारतीय संघर्ष वृत्तसेवा….
राज्यात ऑनलाईन प्रलंबित दंड भरण्यासाठी वाहनचालकांवर जबरदस्ती केल्यास पोलिसांवर कारवाई होणार आहे, असे राज्यातील वाहतूक पोलीस महासंचालक यांनी आदेश दिले आहेत. राज्यात आता ई-चलान वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच कारवाई होणार आहे, असे राज्यातील पोलीस महासंचालकांनी आदेश दिले आहेत. राज्यात रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ई-चलानच्या दंडाची वसुली करताना वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे यावरून आता राज्यातील पोलिसांवर कारवाई होणार आहे.
राज्यातील वाहनचालकांना ऑनलाईन प्रलंबित दंड भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, असे स्पष्ट आदेश पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस कर्मचार्यांना दिले आहेत. या सरकारी सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता कारवाई करण्याचा इशारा राज्यातील पोलिस महासंचालकांनी दिला आहे. राज्यात प्रलंबित ई-चलान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून मोहीम राबवण्यात येत आहे.
मात्र अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून दंड आत्ताच भरा, वाहन किंवा कागदपत्रे जप्त करू, असे बोलतात. राज्यात अशा तक्रारी जास्त वाढल्या आहेत. त्यामूळे राज्यातील गृह विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील नेत्यांच्या बैठकीत पोलिसांच्या या वर्तनाबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील वाहतूक विभागाने ई-चलान दंड वसुलीसाठी एसओपी जाहीर केली आहे. यानुसार, जर वाहनचालक स्वेच्छेने दंड भरण्यास तयार असेल, तरच तो स्वीकारावा.
वाहन जप्तीसारखी कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानेच करण्यात यावी. रस्त्यात वाहनचालकांना अडवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात काम करणारे पोलीस कर्मचारी अनेकदा सरकारी सूचनांकडे दुर्लक्ष करून जनतेला त्रास देत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे राज्यातील पोलिसांची जनमानसातील प्रतिमा खराब होत आहे, असे नव्या परिपत्रकात सुचित करण्यात आले आहे. राज्यातील जे पोलीस अधिकारी, कर्मचारी सरकारी नियमांचे उल्लंघन करत असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश राज्यातील पोलिस महासंचालकांनी दिले आहेत.