” भारतीय संघर्ष न्यूज ”
येवता/विडा:प्रतिनिधी:सा.वा.दि.०६ रोजी
केज तालुक्यातील सासुरा येथे श्री.संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त काल्याचे किर्तन ह.भ.प.क्त श्री.सुरेश महाराज जाधव यांचे झाले कार्यक्रमास पंचकृषीतील भाविक भकक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते,अखंड हरिनाम सप्ताह आयोजन ह.भ.प.श्री. मठाधिपती रतन महाराज सासुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले,या कार्यक्रमास विडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत विक्रमराव मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला शेवटी महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले.